सिमेंट गोण्याच्या आड लपवलेले परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित मध्यप्रदेश राज्यात विक्रीस बनवलेले) असलेल्या वाहतुकीवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१ यांची धडक कारवाई
विवेक मिश्रा
काल दि. २४/०४/२०२६ रोजी मा. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब, सहआयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. श्री. प्रदिप पवार साहेब, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे, मा. श्री. प्रविण तांबे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१, श्री. आनंद पवार साहेब प्रउपअधीक्षक, ठाणे-१, श्रीमती रत्नमाला गायकवाड मॅडम उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील गोवा राज्यात निर्मित मध्यप्रदेश राज्यात विक्रीस बनवलेले मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने बेलापूर ठाणे रोडवर, डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ, नवी मुंबई, ता. जि. ठाणे दिनांक २४/०४/२०२६ रोजी दारूबंदी गुन्हयाकामी गस्त घालत असताना सुमारे १७:१५ वाजता टाटा कंपनीचा (२५१८सी) चॉकलेटी रंगाचा दहाचाकी ट्रक क्र. GJ-०९-AV-९९७५ या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवुन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये वंडर सिमेंटच्या गोण्या भरलेल्या मिळून आल्या त्या बाजूला करून त्याच्या खाली पाहणी केली असता बनवलेल्या कप्यामध्ये पुठ्ठयाचे बॉक्स दिसून आले. ते बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये रॉयल सिलेक्ट डिलेक्स व्हिस्कीच्या १८० मिलीच्या (गोवा राज्यात निर्मित मध्यप्रदेश राज्यात विक्रीस बनवलेले) सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजि. क्र. ९०/२०२६, दिनांक २४/०४/२०२६ नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एकूण १२६५ बॉक्स (१०९२९ ब.लि.) परराज्यातील भा.ब.विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित मध्यप्रदेश राज्यात विक्रीस बनवलेले) चे दारूबंदी गुन्हयाअंतर्गत जप्त केले. तसेच सदर गुन्हयामध्ये टाटा कंपनीचा (२५१८सी) चॉकलेटी रंगाचा दहाचाकी ट्रक क्र. G.J-०९-AV-९९७५ वाहनासह असा एकूण रू. १,४५,२३,९५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्र. १) दिनेश कैलास नाथ (वाहनचालक), २) अनिल कुमार श्याम लाल नायक यांना अटक केली आहे.
सदर कारवाई श्री.एम.पी. धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१, श्री.एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक, श्री.एस. आर. मिसाळ, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१, श्री.बी.जी. थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री.पी.एस.नागरे जवान, श्री.पी.ए. महाजन जवान, श्री.व्हि. के. पाटील जवान, श्रीमती एस.एस.यादव महिला जवान, श्रीमती पी.पी. पाटील महिला जवान, श्री. एम.जी. शेख, जवान नि वाहनचालक इत्यादीसह हजर आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास श्री. प्रविण तांबे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. महेश प्रकाश धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१ हे करीत आहेत.




