दिवा शहरातील गणेश नगर परिसरात एका बौद्ध महिलेवर एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना
दिवा शहरात पुन्हा जातीवाद


दिवा (ठाणे) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दिवा शहरातील गणेश नगर परिसरात एका बौद्ध महिलेवर एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना 
उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास दिवा पूर्व येथील गणेश नगर मार्केट परिसरात ही घटना घडली. पीडित महिला खरेदीसाठी गेली असताना आरोपींनी तिला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर केस ओढणे, तसेच डोक्यावर व पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण करत तिच्यावर हल्ला करण्यात आला. “तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. आरोपींमध्ये मोतीराम दळवी व चेतन्या दळवी यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 74, 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, गंभीर आरोप असूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, आरोपी अलिबाग येथे क्रिकेट खेळत असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिकांकडून आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 3(2) (5) लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध सामाजिक संघटना आक्रमक भूमिका घेत असून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. स्थानिकांकडून आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 3(2) (5) लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध सामाजिक संघटना आक्रमक भूमिका घेत असून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. दिवा बीट पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



