Uncategorizedमहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
Trending
बहुजन समाज पार्टी, ठाणे जिल्हा, कल्याण लोकसभा प्रभारी पदी मा. सुदामजी गंगावणे यांची नियुक्ती.
कल्याण लोकसभा मतदारसंघात नागरिकांत उत्साहाचे वातावरण.

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र, ठाणे जिल्हा, कल्याण लोकसभा प्रभारी पदी मा. सुदामजी गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुदामजी गंगावणे हे एक प्रामाणिक पत्रकार असून बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले, संघर्षशील व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा समाजासाठी असलेला लढाऊ स्वभाव, प्रखर विचारसरणी आणि सरकारी यंत्रणांवर असलेला प्रभाव नक्कीच बहुजन समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. बहुजन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत, राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रेरणादायी ठरेल.

दिपक भाऊ खंदारे
पत्रकार/ महाराष्ट्र प्रमुख



