Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
देशप.बंगालराजनीति
Trending

पश्चिम बंगालमध्ये तुफान राडा, स्ट्राँग रूममधला VIDEO व्हायरल, ममतादीदीही पोहोचल्या

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. तृणमूलच्या काार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन सुरू केली.

बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष्य लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये सत्ता बदल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. पण, अशातच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे.                                                         

           स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. एवढंच नाहीतर घटनास्थळी ममता बॅनर्जी सुद्धा पोहोचल्या आहे.

           पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं असून ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचं भवितव्य बंद झालं आहे. ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहे. पण इथं बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीन छेडछाड केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला, सकाळपासून स्ट्रॉँग रुमच्या बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पण, एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. तृणमूलच्या काार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन सुरू केली. हे पाहून भाजपचेही कार्यकर्ते तिथे जमा झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

           निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
पण, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्तांचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. स्ट्राँग रूमध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे. पोस्ट बॅलेट मतदानांची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. पण, या गोंंधळामध्ये ममता बॅनर्जी सुद्धा तिथे पोहोचल्या. त्यामुळे दोन्ही गटाकडून वाद आणखी पेटला आहे.

                TMCचे आरोप
1. TMC चा आरोप आहे की Bharatiya Janata Party आणि Election Commission of India यांनी संगनमत करून नियमांच्या विरोधात, कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीशिवाय मतपेट्या उघडल्या.
2. पक्षाने याला “दिवसा ढवळ्या लोकशाहीची हत्या” असे संबोधत, निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली सुरू असलेला उघड निवडणूक घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.
3. पक्षाच्या ट्विटनुसार, मतदार याद्यांमधून नावे वगळणे आणि मतदारांना धमकावण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता भाजप निराश होऊन EVM मध्ये छेडछाड करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    4. या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ Shashi Panja आणि Kunal Ghosh यांनी नेताजी इंडोर स्टेडियमसमोर आंदोलन सुरू केले असून, यात Mamata Banerjee देखील सहभागी होणार आहेत.

       5. तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला “दिल्लीचे जमीनदार” असे संबोधत इशारा दिला आहे की बंगालची जनता आपल्या जनादेशाची चोरी शांतपणे सहन करणार नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!