दिवा शहरात भीम जयंतीचा जल्लोष; बहुजन समाज पार्टी दिवा तर्फे नागरिकांना पाव-भाजी वाटप
दिवा शहर बहुजन समाज पार्टी तर्फे नागरिकांना पाव-भाजी वाटप


दिवा (जि. ठाणे) प्रतिनिधी : भारताचे संविधान शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी दिवा शहरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. भव्य मिरवणूकमुळे संपूर्ण दिवा शहर ‘भीममय’ झाले होते.
जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीत विविध डीजे च्या गजरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणुकीमुळे दिवा शहरातील वातावरण आंबेडकरमय झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवा शहरात भीम जयंती मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. मिरवणुकीचे आयोजन सार्वजनिक जयंती उत्सव समिती, यांच्या वतीने करण्यात आले होते.
मिरवणुकीतील सहभागी नागरिकांना बहुजन समाज पार्टी दिवा तर्फे पावभाजी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला बहुजन समाज पक्षाचे मुंबई-कोकण झोन प्रभारी राजेश चंद्रा जैस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुकीतील नागरिकांना पावभाजी वाटप करण्यासाठी प्रामुख्याने प्रशांत विंनकरे,नागेश गमरे, प्रमोद खांबे, जयंतराव, अपर्णा सकपाळ, संगीता जाधव, संजय गुजर, विकास पोहरकर, कृष्णा जयस्वाल, संजय हीरलेकर, दर्शील खंदारे, प्रेम गमरे, आशिष आहिरे, गणेश, गौतम खंदारे यांनी सहकार्य केले.





