दिवा रेल्वे स्टेशन समोर सुरू असलेला अनधिकृत व्हिडिओ गेम व्यवसाय बंद करा!
दिवा अनधिकृत व्हिडिओ गेम

दिवा, ठाणे, रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर नगरसेवक कार्यालया समोर परप्रांतीय शर्मा याने काही बिल्डरांना हाताशी घेऊन तरुण पिढीला ऑनलाइन व्हिडिओ गेम चे व्यसन लावले आहे. सकाळी घरातुन कामावर जाण्यासाठी निघणारे कित्येक नोकरदार तरुण पगार झाल्यावर मात्र दिवस-रात्र दिवा रेल्वे स्टेशन समोरील व्हिडिओ गेममध्ये महीना भराचा पगार उडवताना दिसतात.
व्हिडिओ गेमचे व्यसन लावण्यासाठी
परप्रांतीय शर्मा तर्फे चहा-नाश्ता, जेवण, सिगारेट व दारू मोफत दिली जाते. सर्व पगार हारल्यानंतर तरुणांचा राग शांत करण्यासाठी 20% गुडलक च्या नावाने देवुन पुन्हा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी प्रवूत्त केले जात आहे.
दिवा शहरातील श्री गणेश अनधिकृत व्हिडिओ गेममुळे हजारो कुटुंबांत झगडे, मारामारी , उपासमारीची वेळ आली आहे.अनधिकृत व्हिडिओ गेम बंद करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
🚩 तत्काळ कारवाई करा! 🚩
दिवा रेल्वे स्टेशन समोर सुरू असलेला अनधिकृत व्हिडिओ गेम व्यवसाय बंद करा!
📍 स्थान:
नगरसेवक कार्यालयासमोर,
दिवा, ठाणे
⚠️ गंभीर आरोप –
👉 अनेक वर्षांपासून सुरू अनधिकृत व्हिडिओ गेम
👉 परप्रांतीय व्यक्ती ‘शर्मा’ यांचा व्यवसाय
👉 पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी निष्क्रिय
👉 मोठ्या बिल्डरांची पार्टनरशिप असल्याची शंका
👉 कायद्याचे खुलेआम उल्लंघन
❗ नागरिकांचा इशारा –
“जर हा अनधिकृत व्यवसाय त्वरित बंद केला नाही,
तर दिवा पोलीस चौकी अधिकारी यांच्या विरोधात
मोठा मोर्चा काढण्यात येईल!”
✊ दिवा येथील संतप्त नागरिक




