औषधांच्या नावाखाली बनावट बील तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) असलेल्या वाहतुकीवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१ यांची धडक कारवाई.
विवेक मिश्रा

औषधांच्या नावाखाली बनावट बील तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) असलेल्या वाहतुकीवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१ यांची धडक कारवाई.
दि. ०५/०५/२०२६ रोजी मा. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब, सहआयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. श्री. प्रदिप पवार साहेब, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे, मा. श्री. प्रविण तांबे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१, श्री. आनंद पवार साहेब प्र. उपअधीक्षक, ठाणे-१, श्रीमती रत्नमाला गायकवाड मॅडम उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील गोवा राज्यात निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने आर. सी. पाटील टोल नाका ते माजिवाडा रोड, ठाणे, ता. जि. ठाणे दिनांक ०५/०५/२०२६ रोजी दारूबंदी गुन्हयाकामी गस्त घालत असताना सुमारे १८:३५ वाजता अशोक लेलैंड कंपनीचा सफेद चॉकलेटी रंगाचा सहाचाकी कंटेनर क्र. MP-०९-GG-७९३० या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवुन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये पुठ्ठयाचे बॉक्स मिळून आले. ते बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीच्या (गोवा राज्यात निर्मित) सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजि. क्र. १०२/२०२६, दिनांक ०५/०५/२०२६ नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एकूण १४५० बॉक्स (१२५२८ ब.लि.) परराज्यातील भा.ब.विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) चे दारूबंदी गुन्हयाअंतर्गत जप्त केले. तसेच सदर गुन्हयामध्ये अशोक लेलैंड कंपनीचा सफेद चॉकलेटी रंगाचा सहाचाकी कंटेनर क्र. MP-०९-GG-७९३० वाहनासह असा एकूण रू. १,६५,११,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्र. १) पर्गत सिंग कर्तार सिंग (वाहनचालक), आरोपी क्र. २) अमरीतबिर सिंग हरप्रीत सिंग यांना अटक केली आहे.

सदर कारवाई श्री.एम.पी. धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१. श्री.एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक, श्री. एस. आर. मिसाळ, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१, श्री.बी.जी. थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री.पी.एस. नागरे जवान, श्री.पी.ए. महाजन जवान, श्री.व्हि. के. पाटील जवान, श्रीमती एस.एस.यादव महिला जवान, श्रीमती पी.पी.पाटील महिला जवान, श्री. एम.जी.शेख, जवान नि वाहनचालक इत्यादीसह हजर आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास श्री. प्रविण तांबे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. महेश प्रकाश धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे-१ हे करीत आहेत.




