Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
क्राइमटॉप न्यूज़देशमहाराष्ट्रमाहितीयुवालोकल न्यूज़
Trending

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

उमरगा/ लोहारा

‌‌ तुगाव येथील बौद्ध तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२९) रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

या बाबत उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, (दि १८) मे रोजी तुगाव येथील भालचंद्र चोखोबा कांबळे या बौद्ध तरुणास मारेकऱ्यांनी बोलावून घेऊन गावात दोन जयंत्या का करता म्हणून जातीय द्वेष भावनेतून त्याला गावातील पंकज जोमदे, रोहित जोमदे,महेश जोमदे,चांद फकीर यांनी संगनमत करून रोहित यांच्या शेतातील द्राक्षाच्या बागेतील लोखंडी पोलला हात पाय बांधून बेदम मारहाण केली.या मारहाणीत भालचंद्र हा गंभीर जखमी झाला असून मारेकऱ्यांच्या विरोधात मुरूम पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि १९) रोजी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मात्र पोलिसांकडून आरोपींना पकडण्यास चालढकल केली जात आहे. मारेकरी आरोपी राजरोस गावात फिरत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन त्यांना अटक करीत नाहीत.त्यातच आरोपींचें नातेवाईक फिर्यादीच्या घराकडे रात्री बे रात्री जाऊन पुन्हा दमदाटी करीत असल्याने भालचंद्र कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या वेळी रिपब्लिकन पार्टीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के,हरिष डावरे,एस.के. चेले,बाबासाहेब गायकवाड,संजय कांबळे,धीरज बेळंबकर,दगडू भोसले,यशवंत भंडारे,प्रतीक सूर्यवंशी,रिपाईच्या महिला अध्यक्षा आशा कांबळे,सुमन गायकवाड आदींची उपस्थिती होती.प्रारंभी तहसीलदार निवेदन घेण्यास येत नसल्याने आंदोलकांनी जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तो पर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.

 

          पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारू आंदोलन थांबवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा आंदोलक आक्रमक झाले. तहसीलदार गोविंद येरमे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारल्याने वातावरण शांत झाले.या वेळी तुगाव येथील कार्यकर्ते नीलकंठ कांबळे,

         भालचंद्र लोखंडे,सुदर्शन कांबळे,नागसेन कांबळे,शाहूंराज भोसले,विद्याचंद्र कांबळे,कमळाबाई कांबळे,पंचशीला कांबळे,मंदाकिनी भोसले,छबूबाई सुरवसे,कल्पना गायकवाड,मंगलबाई गवळी,आदी सह तुगाव येथील महिलां पुरुषांची उपस्थिती मोठी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!