Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
E-Paperमहाराष्ट्र
Trending

बहुजन समाज पार्टी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कही हम भूल न जाए, बहुजन महापुरुष्यांच्या सन्मानार्थ विशाल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

हम भूल न जाए, बहुजन महापुरुष्यांच्या सन्मानार्थ विशाल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

बहुजन समाज पार्टी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कही हम भूल न जाए, बहुजन महापुरुष्यांच्या सन्मानार्थ विशाल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

बसपा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड सुनील जी डोंगरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वेस्टर्न झोन प्रभारी विलास शेरखाने, जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे व जिल्हा युनिट धाराशिव यांच्या पुढाकरातून करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे ,संजय थूल साहेब, जी एस टी सहाय्यक आयुक्त(सेवानिवृत्त), धम्मा दहीहिवले,बसपा प्रसिद्धी प्रमुख, झोन प्रभारी अँड संजीव सदाफुले साहेब यांची ऊपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मा.प्रदेश अध्यक्ष डोंगरे साहेब यांनी सांगितले की आरक्षण वर्गीकरण हे सरकार ने अ.जा जातसमुदायात भांडणे लावण्यासाठी खेळलेली सुनियोजित खेळी आहे. कारण मनुवाद्यांनी तोडा फोडा आणि राज करा हीच नीती अवलंबत आतापर्यंत देशातील 85%लोकांवर राज केलेलं आहे. पण आता बहुजन समाज जातींजातीत अडकणार नाही याची खाबदारी घेऊनच पुढील दिशा ठरवावी लागेल असे प्रतिपादन केले. यावेळी जथ्था वामनाचा हा योगीराज आनंद निर्मित समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी बसपा चे सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, धाराशिव महिला बसपा संघटक स्वाती खुणे, धाराशिव जिल्हउपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे जिल्हामहचिव प्रवीण जगताप, जिल्हा कोशाध्यक्ष सुशील गायकवाड अध्यक्ष राजेंद्र गायकवाड,उपाध्यक्ष तानाजी सुरवसे ,कोषाध्यक्ष दीपक सोनकांबळे,संतोष सोनकांबळे कुंडलिक कांबळे आयान जवळे लहू खुणे, विधानसभा महिला संघटक गायकवाड मॅडम तानाजी गायकवाड रेखाव्रजेंद्र गायकवाड क्षितिज गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!