Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
ठाणेडोंबिवलीदिवामहाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

दिवा शहरात जनगणना प्रशिक्षणाकडे शिक्षकांनी पाठ फिरवली; प्रशासनाचे कडक पाऊल

दिवा शहरात जनगणना प्रशिक्षणाकडे शिक्षकानी पाठ फिरवली; प्रशासनाचे कडक पाऊल

             ठाणे : दिवा परिसरात जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही शाळांतील शिक्षक प्रशिक्षणाला गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व चार्ज अधिकारी शिवप्रसाद नागरगोजे यांनी संबंधितांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

             दिव्यातील ड्यू ड्रॉप स्कूल, ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि साउथ इंडियन स्कूल येथील काही शिक्षकांनी शासकीय प्रशिक्षणास अनुपस्थित राहून राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती नागरगोजे यांनी दिली.

            दरम्यान, इतर काही शाळांतील शिक्षकही प्रशिक्षणाला गैरहजर राहत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या विरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही शिक्षकांनी परीक्षा व शैक्षणिक कामकाजाचे कारण देत अनुपस्थिती दर्शवली असल्याचे समोर आले आहे.

           या पार्श्वभूमीवर घराघरांत जाऊन माहिती संकलन करण्याच्या ‘हाऊस-लिस्टिंग’ प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने मात्र कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर भूमिका कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!