Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
E-PaperUncategorizedदिवामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
Trending

दिवा शहरात अचानकपणे आपात्कालीन परिस्थिती उद्वल्यास दिव्यात शासकीय मोठे रुग्णालय नाही! – राहूल शिंदे , सामाजिक कार्यकर्ता

आपात्कालीन परिस्थितीत शासकीय 24/7 डॉक्टर सेवा नाही!

🏥 दिवा शहरात 24 तास शासकीय रुग्णालय नाही. 🏥

🚑 मग किमान शासनाने 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करावी. 🚑

 

              दिवा शहरासाठी 108 या टोल-फ्री क्रमांकाची शासकीय मोफत रुग्णवाहिका (24 तास) उपलब्ध होणे लोकसंख्यावाढीचे प्रमाण पाहता आरोग्याच्या दृष्टीने काळाची मोठी गरज आहे  – राहुल शिंदे,सामाजिक कार्यकर्ते

   दिवा शहरातील जनतेच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिव्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी खरच राज्य शासन व आरोग्य विभागाला वाटते का?

महत्वाची बाब म्हणजे एक सोपे उदाहरण असे आहे.

 Zomato, swiggy  व  Domino’s सारख्या खाण्याचे पार्सल व इतर गोष्टी १५ ते २० मिनिटांत व त्या पेक्षा कमी वेळात घरपोच पोहोचतात.

Parcel delivery boy  चा नंबर app च्या माध्यमातून ताबडतोब ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला पाठवला जातो.  मग आपात्कालीन परिसरातील असलेल्या ( पिडीत रुग्ण, अपघातजनक रुग्ण, हृदयविकाराशी व कर्करोगाशी संबंधित रुग्ण व अचानकपणे इतर अल्पशा आजारांशी त्रस्त झालेल्या रुग्णांना तसेच गरोदर स्त्रीया ) आश्या आपात्कालीन परिस्थिती मध्ये. 

       १)   रुग्णवाहिका मिळवण्यासाठी मुख्य शासकीय हेल्पलाईन असलेल्या 108  या क्रमांकावरून  रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक ते दिड तासांचा अवधी का लागतो?

२) रुग्णवाहिका १० ते १५ किलोमीटर व त्या पेक्षा अधिक लांब अंतरावरून का पाठवल्या जातात?

३) 108 या हेल्पलाईन वरून फोन आल्या नंतर रुग्णवाहिका उपलब्ध अहे का? फक्त हे विचारण्यासाठी सदर गरजूवंत व्यक्तीचा फोन १० ते १२ मिनिटे होल्डवर का ठेवला जातो?

४) रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांशी संवाद साधून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांचे फोन २० ते ३५ मिनिटे होल्डवर का ठेवले जातात.

५) ५ ते ७ लाख व त्या पेक्षा अधिक झपाट्याने सतत वाढत असेल्या लोकसंख्येच्या दिवा शहरात आपात्कालीन १०८ क्रमांकाची शासकीय मोफत रुग्णवाहिका दिवेकरांच्या सेवेसाठी अद्याप स्वातंत्र्यपणे उपलब्ध का नाही?

६) रुग्णवाहिकेतील डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर संबंधित डॉक्टरांचा नंबर त्वरित व सर्वप्रथम का पाठवला जात नसावा?

७) ज्या प्रकारे ठाण्यातील डायघर गावांमध्ये 108 टोल फ्री क्रमांकांच्या शासकीय आपात्कालीन रुग्णवाहिका आहेत. त्याच धर्तीवर 

          कल्याण ग्रामीण विधानसभा व कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार्या दिवा शहरात मोफत रुग्णवाहिका सेवा दिवा शहरासाठी स्वातंत्र्यपणे उपलब्ध व्हावी ही प्रत्येक दिवेकर जनतेची मागणी आहे.

अचानकपणे आपात्कालीन परिस्थिती उद्वल्यास दिव्यात शासकीय मोठे रुग्णालय नाही!आपात्कालीन परिस्थितीत शासकीय 24/7 डॉक्टर सेवा नाही! महाराष्ट्र शासन  सार्वजनिक आरोग्य विभागाने व ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाने ताबडतोब आरोग्याच्या दृष्टिने पाऊले उचलून दिवा शहराला एक स्वातंत्र्य शासकीय मोफत रुग्णवाहिका मिळवून द्यावी ही नम्र विनंती.

 

प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे!

आपात्कालीन परिस्थिती सांगून येत नाही!

प्रत्येक जीव महत्वाचा आहे!

दिवा शहरात शासकीय रुग्णालय नाही? हरकत नाही! कधी बनेल ठाऊक नाही! शासकीय मोफत आपात्कालीन २४ तास रुग्णवाहिका सेवा आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध होणे दिवा शहरात खुप मोठी काळाची गरज आहे. 

 

✍🏻

:-राहुल शिंदे,सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!